भाजपा युवा मोर्चाच्या महिला नेत्याकडे सापडले १०० ग्राम कोकिन

भाजपच्या युवा महिला नेत्याला स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी भाजपाच्या माहिला नेत्याकडे १०० ग्राम कोकीन सापडले आहे भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव पामेला गोस्वामी असे आहे. पामेला गोस्वामीसोबतच तिचा सहकारी प्रबीर डे यालाही न्यू अलीपूर विभागातून अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पामेला गोस्वामी कोकीन घेऊन आपल्या कारमधून जात असतानाच पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तिला कोकीन पुरवणाऱ्या प्रबीर डे यालाही अटक केली आहे. प्रबीरला कोलकात्यामधील अलीपुर येथील एनआर अ‍ॅव्हेन्यू येथून अटक करण्यात आली आहे. पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत कारमध्ये तिचा एक सुरक्षारक्षकही होता.

अमली पदार्थांच्या सध्याच्या किंमतीनुसार जप्त करण्यात आलेले कोकीन हे पाच लाख रुपयांचे आहे. पोलीस सध्या पामेलाची चौकशी करत आहे. पोलीस पामेलाला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे. त्यानंतर पोलीस पामेलाच्या कोठडीसाठी मागणी करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Team Global News Marathi: