‘शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच राहते राऊत यांचा नारायण राणे यांना टोला |

 

संसदेत आज अनेक खासदारांना ओळखले जात नाही, मात्र शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून एक वेगळी ओळख आहे. तो नारायण राणे, तो आमुक – तमुक असं बोलत नाही. हा शिवसेनेचा आहे असे म्हणूनच ओळखतात असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. सोनई येथील शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सहकार सम्राटांची ओळख असलेला नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा ‌जिल्हा व्हावा, ज्या जागा आपण हारलो आहोत त्याही जिंकायच्या आहेत. सहकाराची जाण असलेले शंकरराव गडाख शिवसेनेत आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. शंकरराव गडाख निवडून आल्यानंतर सुरूवातीपासुन शिवसेनेसोबत उभे आहेत कुंपनावर नाही अस वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

सरकार असुन शिवसैनिकांची कामे होत नाही असं म्हणू नका सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो तरी शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोली पाठवू का ? असा दम देवू शकतो म्हणून सत्ता हा मानसिक आधार आहे. पंतप्रधान मोदी देखील मला म्हणतात कैसे हो भाई ? याला सत्ता म्हणतात. शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी मवाली, गुंड म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो वाघासारखे मरणार… शंकरराव गडाख सध्या सौम्य बोलतात, तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल अशा शैलीत खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

Team Global News Marathi: