‘त्या’ सूचना केंद्राच्या गृहखात्याच्याच, राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी”

 

कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. यावरून आमदार नितेश राणे यांनी आघाडी सरकारला टोला लगावला होता. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे.

केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. विनायक राऊत यांनी मीडियाशी बोलताना लूकआऊट नोटिसच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांचा जोरदार समाचार घेतला होता.

डिएचएफल फायनान्स कंपनीच्या संचालकांनी या प्रकरणी केंद्राच्या गृहखात्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची रक्कम देणं असल्याने या दोघांना देशाबाहेर जावू देवू नका असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारच्या गृहखात्याला दिल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला.

Team Global News Marathi: