निवडणुकीत बोंबलायचंय म्हणून आता …. राज ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ

 

येत्या काही महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असे वक्तव्य महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष करत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आता मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. आता थेट राज ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीत बोंबलायचंय म्हणून घशाला आराम आराम देतोय

जानेवारीमध्ये निवडणुका लागणार असं सूचक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. तसेच आपण या निवडणुकीची तयारी करत असल्याचे वक्तव्यही राज ठाकरे यांनी केले आहे. निवडणुकीत बोंबलायचंय म्हणून घशाला आराम आराम देतोय असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे जानेवारीत निवडणुका लागतील हे स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंनी मुंबईतल्या मिसळ महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी हे विधान केलं.

निवडणुकांच्या चर्चेचह राज ठाकरेंची मनसे कोणासोबत जाणार याकडे देखील सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपासून मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आपली भूमीका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतीक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: