नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन तासांच्या भेटीत काय झाली चर्चा?

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी नितीन गडकरी रात्री साधारणत: 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. रात्री जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानातून बाहेर पडले. यावेळी नितीन गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी उपस्थित माध्यमांना माहिती देताना नितीन गडकरी यांनी म्हटलं, “माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. तसेच या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असे सुद्धा बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: