‘मुंडें साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही’; पुन्हा धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका

 

पुणे | मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद आता सर्वश्रुत झाले आहेत अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात नाव न घेता पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे. रविवारी पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसरात हा उद्घाटन सोहळा पार पडला.

या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लावली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना टोला लगावला. या टीकेमुळे मुंडे बहीण-भावांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. ‘गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली, पण त्यांना हे महामंडळ निर्माण करता आले नाही’, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणे शक्य झाले नाही. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी. आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे’, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

Team Global News Marathi: