नितीन गडकरींमुळे मला आमदारकी मिळाली, चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

 

सतत विरोधकांवर टीकेची झोड उठवणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला ही संधी काशिमिळाली याबद्दल भाष्य केले आहे. राजकीय जीवनात आमदारकी मिळाली ती नितीन गडकरी यांच्यामुळे मिळाली अस विहान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से पाटील मनमोकळेपणानं बोलले.

तसेच य चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्तीत गृहमंत्री अमित शाह यांचादेखील आपल्या राजकीय जीवनात मोलाचा वाटा असल्याचं पाटील यांनी सांगितलं. “कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंकाही नाही,” असं ते म्हणाले.

विधान परिषदेचा नेता कोण व्हावा याबाबत अमित शाह यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. वरच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटीलच बनतील असं अमित शाह यांनी सहजरित्या देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यात काही समस्या नव्हतीच. २०१४ ते २०१९ या कालावधीत मला जे काही मिळालं त्यासाठी जी एक साथ आवश्यक होती ती देखील अमित शाह यांनी दिल्याचे ते म्हणाले.

Team Global News Marathi: