नितेश राणेंकडून भाजपा बरोबर जुळवून घेण्याचे संकेत, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया !

 

महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर सतत टीका करणारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी भाजपा बरोबर जुळवून घेण्याचे विधान करून नव्या राजकीय चर्चेला सुरवात केली होती. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळ्याला आ. नितेश राणे बोलत होते. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊतदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान नितेश राणे यांनी आधी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी माफी मागावी अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे.

“तो राजकीय कार्यक्रम नव्हता. १३ वर्ष रखडलेला हा प्रकल्प होता, त्यामुळे तो पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांना होता. एक लक्षात घेतलं पाहिजे की, नितेश राणे यांच्याशिवाय कोणीही राजकीय भाषण केलं नाही. त्यांनी विकासात सर्वांनी एकत्र असलं पाहिजे असं म्हटलं आहे.

राणे यांनी मांडलेली भूमिका आम्हाला मान्य आहे. पण नितेश राणेंना शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊ शकेल असं वाट असेल तर त्यांनी प्रतीविधानसभा घेतली तेव्हा काय वक्तव्य केलं हे पाहिलं पाहिजे. आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासला पाहिजे असं म्हणणं योग्य आहे का ? हे चरित्रहनन असून साध्या कुटुंबीतील व्यक्तीनेही सहन केलं नसतं,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: