मुंबई | दिशा सालियन प्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना आज चौकशीसाठी दुपारी एक वाजता मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना कोर्टाने १० मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. दिशा सलियान प्रकरणात राणेंनी केलेल्या वक्तव्यांनंतर महिला आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणात आज नारायण राणे आणि नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतील.
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपल्याकडे असलेली माहिती आणि पुरावे पोलिसांना सादर करतील. त्यानंतर पोलिसांकडे या प्रकरणा संदर्भातले धागेदोरे शोधण्यासाठी काही प्रश्न उपस्थित करु शकतात, ते प्रश्न पुढीलप्रमाणे असू शकतील.
दिशा सालियन वर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.