नेत्यांच्या सुरक्षेसाठी उद्धव ठाकरेंकडून नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना

 

फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या अडचणीत आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली. “आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल होत असतात.त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे

याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र, जबाबदार लोकांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. चार चौघात चुकून एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो.” असे ते म्हणाले.तत्कालीन सरकारमध्ये फोन टॅपिंगच्या घटना घडल्या आहेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे सांगितले होते. सरकार जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असते. आत्ताच्या सरकारला कोणतेही साधनसुचिता राहिली नसून ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. पण त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही.

शिवसेनेला जे काही करायचे आहे, ते समोरासमोर करते. पण तरीही मी माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या. सरकारकडून लोकांना त्रास दिला जात असल्यामुळे या सरकारवर आमचा बिलकुल विश्वास नाही. हे सरकार अशा गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकतो, त्यामुळे आपण खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: