राष्ट्रवादीच्या ‘त्या’ वागणुकीचा राग, पण द्वेष नाही, नाना पटोले यांची रोखठोख भूमिका

 

 

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं चित्र आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच काही दिवसांपूर्वी मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांना आपल्याकडे गोटात सामील करून घेण्यात राष्ट्रवादीला यश आलं होतं. तसेच त्याआधी भिवंडीतही काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


आता त्याचाच बदला म्हणून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह २० नगरसेवकांना आपल्या गळाला लावत पक्षात प्रवेश दिला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू या नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यासोबतच मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसचा झेंडा आपल्या हाती घेतला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी न करता समन्वयाने काम करावे, असं आवाहन केलं. यावेळी त्यांनी भिवंडी आणि मालेगावच्या प्रकरणांवरही रोखठोक भूमिका मांडली. नाना पटोले नेमकं काय म्हणाले? “महाविकास आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांचा राग आलाय. मोठ्यांनी चूक केली तर लहानेही काय करु शकतात हे दाखवले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. सर्व पक्षांचा समन्वय असावा, अशी आमची भूमिका होती. आमच्या सहकारी पक्षांनी मालेगाव, भिवंडीमध्ये जे काही केलं त्याचा राग आलाय पण द्वेष नाही. मोठ्यांनी मोठ्या पद्धतीनं राहीलं तर सन्मान होतो.

मात्र मोठ्यांनीच चूकीच्या पद्धतीनं वागलं तर लहानही मोकळा राहु शकतो, हाच संदेश आम्ही यानिमित्तानं देतोय”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. “आम्ही आज सुरुवात केली आहे. आम्ही कोणाला प्रलोभनं देत नाही. कोणाशी स्पर्धा नाही. समनवय्याने वागावे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सरकार वेगळे, पक्ष वेगळे आहेत. महाविकास आघाडीत यामुळे कुरबुरी नाहीत असं पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं.

Team Global News Marathi: