राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात शिवसैनिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

 

राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिवली करून महाविकास आघडीचे सरकार स्थान केले होते मात्र दुसरीकडे स्थानिक पातळीवर या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र अनीकडं दिसून आले होते अशातच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसैनिकांनी आणलेले कामं स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर यांनी अडवल्याने त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बीड मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तवणुक मी सहन करनार नाही, सदर अडवलेली कामे तात्काळ शिवसेनेला द्यावेत. अशी मागणी वजा तक्रार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे केली आहे.

बीड तालुक्यातील चऱ्हाटा व पालवण गावाला जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी म्हणून आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात या कामांना समाविष्ट करून मंजूरी दिली. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी अडवणूक सुरू केल्याने, नाईलाजास्तव आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला.

Team Global News Marathi: