राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

 

पुणे | राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे सकट संपलेले नसताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आज वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने काही दिवसांपूर्वी संपूर्ण राजभरात आंदोलन छेडले होते. आता त्या पाठोपाठ राष्ट्र्वादी काँग्रेसने सुद्धा मोदी सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत.

सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल – डिझेल दरवाढ करून केंद्रसरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे त्या म्हणाल्या. सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, आज देशभरातील महिला भगिनी आपल्याला विचारतात, ‘क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: