मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक, चीड आणणारे… चित्र वाघ यांनी साधला पुन्हा निशाणा

 

मुंबई | कदमवाकवस्ती येथील सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने जोरदार मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांना सुद्धा लक्ष केले होते.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भातला एक व्हीडिओच स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. वाघ यांनी ट्विट करत हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहेअसल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

त्या ट्विटमध्ये म्हणतात की, गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्याजवळील कदमवाकवस्ती येथे लसीकरणाच्या श्रेयवादावरून शुक्रवारी सरपंच गौरी गायकवाड गटाची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच यात सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. याबाबत वाघ यांनी गायकवाड यांना यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

Team Global News Marathi: