शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा ८० हजार रोजगाराचा संकल्प

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा ८० हजार रोजगाराचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात ऑनलाइन पद्धतीने राज्यव्यापी महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. या ऑनलाइन मेळाव्यात ८० हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचे लक्ष राष्ट्रवादी पक्षाने ठेवले आहे. अशी माहिती मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिलेली आहे.

कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. रोजगारासाठी लोक अडचणीत असतानाच राष्ट्रवादीने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामध्ये राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आजपासून ‘महास्वयंम’ पोर्टलवर आमचे कार्यकर्ते व युवकचे कार्यकर्ते राज्यभर इतर संघटनांचे कार्यकर्त्यांनी त्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नोंदणी १२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. १२ डिसेंबरला जे लोक नोंदणी करतील किंवा नोंदणी झालेले आहेत. त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे.सोमवारपासून ज्या रोजगार देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची नोंदणी सुरू झाली आहे. सोमवार सकाळपर्यंत २१४ कंपन्यांनी माणसांची गरज आहे म्हणून नोंदणी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: