‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!, हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!, हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायद्या विरोधात आज ८ डिसेंबर भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यातच अभिनेता हेमंत ढोमेने कृषी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!, असं ट्विट हेमंत ढोमेने केले आहे.

हेमंतने शेतकऱ्यांना आंदोलनाचे समर्थन करण्याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने Isupportfarmerprotest शेतकऱ्यांचालढा असे हॅशटॅग वापरले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: