प्रसिद्ध गायिका वैशाली माडेंच्या हाती राष्ट्रवादीचे “घड्याळ”,सोपवली महत्वाची जबाबदारी

मुंबई । पिंगा फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट,साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंगा फेम आणि हिंदी,मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आज आपल्या राजकीय इनिंगला सुरूवात केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार वैशाली माडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट,साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: