सोन्याच्या दरात पुनः घसरण; चांदीही उतरली ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 339 रुपयांनी घट झाली. यामुळे दिल्लीतील सोन्याची किंमत दहा ग्रॅम 48,530 रुपयांवर आली. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,869 रुपये होता. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला, असे तज्ज्ञांनी सांगितले.

स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत (Silver Price in Spot Market)

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते चांदीच्या किंमतीत 475 रुपये प्रति किलोची घसरण दिसून आली. त्यामुळे शहरातील चांदीचा दर प्रति किलो 70,772 रुपयांवर आला. मागील सत्रात म्हणजेच बुधवारी शहरातील चांदीचा दर (Silver Rate) 71,247 रुपये प्रतिकिलो होता.
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीची किंमत (Gold, Silver Price in International Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1,893 वर घसरला. त्याचबरोबर चांदीची किंमत प्रति औंस 27.79 डॉलरवर स्थिर राहिली.एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, गुरुवारी सोन्यात विक्री झाली.

फ्युचर्स मार्केटमधील सोन्याचे भाव (Gold Prie in Futures Market)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये संध्याकाळी 05:24 वाजता सोन्याचा दर ऑगस्ट 2021 मध्ये 461 रुपयांनी किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून तो प्रति १० ग्रॅम 49,140 रुपये घसरला. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये सोन्याचा दर 531 रुपयांनी म्हणजेच 1.06 टक्क्यांनी घसरत होता, तो प्रति १० ग्रॅम 49,450 रुपये होता.

फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)

एमसीएक्सवर, जुलै २०२१ चा चांदीचा भाव 1,027 रुपये किंवा1.41 टक्क्यांच्या तोटासह 71,651 रुपये प्रतिकिलो राहिला. सप्टेंबर 2021 मध्ये चांदीचा भाव 951 रुपयांनी घसरून 72,865 रुपये प्रतिकिलोवर होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: