देशमुखांच्या घरी ईडीची कारवाई, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सूचक विधान !

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अर्थात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलं आहे. या कारवाईवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, याबाबत जास्त बोलू इच्छित नाही, संबंधित यंत्रणा तपास करत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्यकरणीत काय ठरवायचं हा त्यांचा प्रश्न आहे.मुळात आज राज्यामध्ये कोरोनासारखे विषय आहेत,सामजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक प्रश्न आहेत.

त्यामुळे भाजपकडून चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. कोणी मागणी केली म्हणून लगेच उद्या तसे होईल असं नाही. पण राज्यात सीबीआयला चौकशीला यायचं असेल तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे असेही वळसे पाटील यांनी बोलून दाखविले आहे.

Team Global News Marathi: