नगरमध्ये भाजपाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र |

 

नगर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा देत सेना-राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीसोबत मिळून निवडणूूक लढवू असं वक्तव्य केलं होतं. आता संजय राऊत यांच्या वक्तव्याचा प्रत्यय येताना दिसत आहे.

नगरमध्ये सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्याचे ठरविले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर महापालिकेत महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. महानगर पालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला महापालिकेत महापौरपद मिळालं नव्हतं. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष राहिला होता.

दरम्यान, ३० जून रोजी सकाळी महापौर निवडणुकीसाठी ३० जूनला सकाळी ११ वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. महापौरपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव आहे. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे आता भाजपचा पत्ता कट होणार हे निश्चित झालं आहे.

Team Global News Marathi: