अन बंद दाराआड चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलणं टाळलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जव्हारमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पालघर हा नव्यानं झालेला जिल्हा आहे. तिथल्या सुविधांची मुख्यमंत्र्यांनी पहाणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांनी बंद दाराआड केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा केली होती.

स्थानिक पत्रकार स्थानिक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना बोलतं करत होते. त्याच वेळेस एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांना भाजपच्या कुठल्याही टिकेला उत्तर द्यायचे नव्हते असेच चित्र पत्रकार परिषदेत दिसून आले होते. प्रश्नही तसे विचारले जात नव्हते.

पण बोलता बोलता त्यांच्या तोंडी बंदी दाराआडची चर्चा आली अन् खुद्द मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणासाठी बदलले. पत्रकार बंद दाराआडच्या चर्चेच्या शब्दावरुन पुढं गेले होते पण तरीही मुख्यमंत्र्यांनी, थांबा मला थोडं बंद दाराआडच्या चर्चेवर बोलू द्या म्हणत, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचा त्यांनी तपशिल दिला.

अमित शाहांच्या टिकेवर बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळले अमित शाहांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही आतापर्यंत बोललेला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे गेले. साहजिक आहे त्यांना अमित शाहांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला जाणार. एका पत्रकारांनं तो प्रश्न विचारलाही पण, इथल्या प्रश्नावर बोलू म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांचा सिंधुदुर्ग दौरा आणि त्यातल्या टिका टिप्पणीवर बोलणं टाळले होते.

Team Global News Marathi: