एनसीबी-भाजप संबंधाची चौकशी करा, काँग्रेसने केली मागणी

एनसीबी’ने मुंबईत क्रूझवर छापे टाकून केलेल्या कारवाईवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला आहे. त्यातच या कारवाईत भाजपचे पदाधिकारी व खाजगी व्यक्तीचा सक्रीय सहभाग कसा, त्यांच्या हातात आरोपींना का सोपवले, एनसीबी आणि भाजप यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर प्रचंड मोठा अमली पदार्थांचा साठा सापडला असताना त्यावर कारवाई झाली नाही, मात्र मुंबईत क्रूझवर छापे मारून काहीतरी मोठी कारवाई केल्याचा आवा आणत एनसीबीने मुंद्रा प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. एनसीबीच्या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना एनसीबीने मुख्य प्रश्नांना बगल देऊन उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सावंत यांनी सांगितले.

‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या कारवाईवेळी नियमांचे पालन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे या छाप्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर एनसीबी महासंचालवकांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

Team Global News Marathi: