नायगावमध्ये शिवसैनिकांडून इंधन दरवाढीचा निषेध

 

वडाळा: ‘थाली बजाओ खुशिया मनाओ’ म्हणत अभूतपूर्व इंधन दरवाढ उपहासात्मकरीत्या साजरी करण्यासाठी वडाळा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, युवासेनेच्या वतीने वडाळा पश्चिम, नायगाव, दादर परिसरात रविवारी (ता.३) आनंदोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी दिवसेंदिवस महागाईच्या खाईत लोटणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
‘पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतीचे फलक वाचा आणि थंड बसा’, ‘पेट्रोल, डिझेल १०० पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकार’ अशा एक ना अनेक घोषणा हातात फलक घेऊन देण्यात आल्या. या वेळी युवा सेना कोषाध्यक्ष, माजी नगरसेवक अमेय घोले, माजी नगरसेविका ऊर्मिला पांचाळ, युवासेना सचिव मयूर कांबळे, अभय चव्हाण, युवासेना विभाग अधिकारी रितेश सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लालबाग हिंदमाता येथे थाळी बजाव आंदोलन केले. थाळी वाजवून जाहीर निषेध केला. यात शिवडी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवती पदाधिकारी, शिवसैनिक, महिला शिवसैनिक, अंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Global News Marathi: