नवाब मालिकांच्या अडचणी वाढणार वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याबाबत ७ जागांवर छापेमारी

 

मुंबई | ड्रग्ज केस प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यातच फडणवीसांवर घणाघाती टीका करत एकच खळबळ उडवून दिली होती त्या पाठोपाठ आता नवाब मलिक आता अडचणीत येताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात ईडीकडून औरंगाबादमध्ये कछापेमारी सुरू करण्यात आली आहे.

वक्फ बोर्डाच्या जमिन खरेदी-विक्रीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही छापेमारी केली जात आहे. पुण्यातील सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. त्यासोबतच औरंगाबादमध्येही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी आपले शस्त्र बाहेर काढले आहे.

यापूवी सुद्धा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांवर ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केली होती काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सुद्धा ईडीने कारवाई केली होती तसेच त्यांच्या नातेवाईकांवर छापेमारी करत कारवाई केली होती मात्र आता भाजपवर टीका करणे नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी कार्य प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: