१९४७ साली देशाला स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली! पुन्हा कंगनाने वादग्रस्त विधान

 

सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. देशाला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने बेताल वक्तव्य केलं आहे. यावरून आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या समिट २०२१ या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली आहे की, ‘स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल, तर ते स्वातंत्र असू शकत का?  १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र… ही भीक होती, खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं’, असं वादग्रस्त विधान तिने केलं आहे.

या कार्यक्रमात कंगणा म्हणाली की, ‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर यांना माहित होत. रक्त वाहणार. मात्र हे ही लक्षात असुद्या, हिंदुस्थान्यांनी हिंदुस्थानींचे रक्त वाहू देऊ नये. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती. स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले.’ असे विधान करून नव्या वादळ तोंड फोडले आहे.

कंगनाच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमची संचालिका नाविका कुमार म्हणाली की, यामुळेच सगळे तू भगवा असल्याचे म्हणतात. यावर कंगणा म्हणते की, आता यानंतर माझ्यावर आणखीन १० गुन्हे दाखल होणार आहे. मग नाविका म्हणते, आता तर तू दिल्लीत आहेस. त्यावर कंगना म्हणते, मात्र जायचं तर घरीच आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात उपस्थित काही लोक टाळ्या वाजू लागले. हा व्हिडीओ पाहून बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच संतापली आहे. या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत ती म्हणाली की, ‘हे ऐकून टाळ्या वाजवणारे ते कोण मूर्ख लोक आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे असं ट्विट केले आहे.

Team Global News Marathi: