नवाब मलिक यांचा आणखी एक खुलासा, समोर आणली एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. रविवारी हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य आहेत आणि ती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र पत्रकार परिषदेच्या आधीच नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

त्यातच आज ट्विट करुन त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत ते नवनवे आरोप करत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी वारंवार आरोप करत त्यांनी बनावट प्रमाणपत्रांद्वारो नोकरी मिळवल्याचे म्हटले आहे. त्यानंतर रविवारी हॉटेल ललितमधील माहिती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी याआधी म्हटले होते. त्यानंतर आता नवाब मलिक कोणता नवा खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक यांनी आज ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले. तसेच तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय असे म्हटले.

Team Global News Marathi: