पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल? काय म्हणाले राहुल गांधी

 

तामिळनाडू |काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपली दिवाळी दिल्लीत आलेल्या तमिळनाडूच्या मूलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली तसेच त्यांच्यासोबत मांसोबत गप्प सुद्धा ठोकल्या होत्या. या लहान मुलांसोबतचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी लिहिलं, की सेंट जोसेफ स्कूलच्या मित्रांसोबत बातचीत आणि रात्रीचं जेवण केलं. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानं दिवाळी अधिकच खास बनवली.

यासोबतच राहुल गांधींनी लिहिलं, की विविध संस्कृतींचा हा संगम आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण हे जपायला हवं. यादरम्यान एका व्यक्तीनं राहुल गांधींना विचारलं, की काँग्रेसचं सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घ्याल? या व्यक्तीचा सवाल ऐकताच काहीही विचार न करता राहुल गांधींनी सांगितलं, की महिला आरक्षण असे प्रतिउत्तर दिले आहे.

राहुल गांधी म्हणाले, की जर ते पंतप्रधान झाले तर त्यांचा पहिला निर्णय महिला आरक्षणाबाबत असेल. विद्यार्थ्यांसोबत बातचीत करताना राहुल गांधी म्हणाले, जर कोणी मला विचारलं की मी माझ्या मुलांना काय शिकवेल, तर याचं उत्तर विनम्रता असं असेल. कारण विनम्रतेमुळेच तुम्हाला समज येते. काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवाद नको; मुख्य प्रवाहात व्हायचंय सामील-जितेंद्र सिंह याआधीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी तमिळनाडीच्या दौऱ्यावर होते. यावेळी तमिळनाडूच्या मूलगुमूदनच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये ते पोहोचले होते. इथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपारिक डान्स केला होता.

Team Global News Marathi: