नवाब मलिकांना कारागृहात मिळणार खुर्ची आणि गादी

 

मुंबई | जमीन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा ईडीच्या कोठडीत मुक्काम आणखी वाढला आहे. कोर्टाने नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, मलिक यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

जमीन घोटाळा प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि 21 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मात्र, नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: