नवाब मलिक यांच्यावरील आरोपांचा तपास झाला सुरू !

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एन्सीएबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप ल;भागवत एकाच खळबळ उडवून दिली होती. याच पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली होती आता या केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल ‘बोगस’ या शब्दाचा वापर केला होता. वर्षभरात त्यांची नोकरी जाणार, त्यांना तुरुंगात टाकणार, अशी विधाने त्यांनी केली होती. वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आरोपांबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. वानखेडे यांनी दिल्लीला जाऊन पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सुपुर्द केले.

आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबरला नोटीस दिली आहे. याचा सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण गोरेगाव विभागाच्या हद्दीतील आहे. परंतु, गोरेगाव विभागाच्या कारभाराची अतिरिक्त जबाबदारी बोरीवली विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे (एसीपी) असल्यामुळे, बोरीवली विभागाच्या एसीपी रेखा भवरे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू आहे.

Team Global News Marathi: