नवनीत राणांचा दावा ठरला साफ खोटा, पोलिसांनी कोर्टामध्ये केले पुराव्यासह सिद्ध

 

अमरावती | अमरावतीत मनपा आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली पण आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला होता. पण वैद्यकीय तपासात कुणालाही मारहाण न झाल्याचे समोर आले. या कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस कोठडीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना पोलीस जबर मारहाण करत असल्याची तक्रार सूरज मिश्रा,अजय बोबडे, महेश मुल चंडाणी, संदीप गुल्हाने या आरोपींनी थेट न्यायाधीशांकडे केली होती. पण, न्यायाधीशांनी त्या सर्वांचे पाहणी केली व या आरोपींना पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय तपासणी दरम्यान जखमा नसल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे. मात्र ही तपासणी पोलीस अधिकार्याच्या उपस्थितीत करण्यात आली.

त्यामुळे त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही असे आरोपींच्या वकिलानी सांगितले. न्यायालयाने चारही आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच दोन दिवसाची पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एका आरोपींची तब्येत खराब झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी आमदार रवी राणांसह सहा जण अद्यापही फरार आहे. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Team Global News Marathi: