नवीन वर्षात घोटाळे बाहेर काढणार म्हणत सोमय्यांची यादी जाहीर

 

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यानावर आणि तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोपकेले होते कालांतराने शिवसेनेमध्ये फूट पडून शिंदे आणि उद्धव ठाकरे गट असे दोन भाग पडले होते अशातच आज वर्षाचा शेवटचा दिवस असताना सोमय्या नव्या रस्जत कोणत्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असा प्रश्न पडलेला असताना किरीट सोमय्या यांनी ट्विट करत घोटाळ्याचे नवीन निशाणे जाहीर केले आहेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे सांगितले आहेत.

किरीट सोमय्या यांनी “नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील.” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी म्हटले असून ५ नेत्यांची नावे सांगितले आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गट आमने सामने येणार असेच चित्र नव्या वर्षात दिसून येणार असून सोमय्या यांच्या या ट्विटला ठाकरे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: