आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे गुहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता आघाडी सरकार मधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण झालेली आहे. राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या संदर्भातील माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटकरून दिलेली आहे. ” माझ्या कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून आपल्या सेवेसाठी हजर होईल. अशी माहिती ट्विट करून त्यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच शिरकाव झाल्यापासून आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दादा भुसे, धनंजय मुंडे,अनिल देशमुख यांना ही कोरोनाची लागण झाली होती.

Team Global News Marathi: