नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद, प्रकल्पग्रस्तांचा सिडकोला घेराव !

 

नवी मुंबई | नवी मुंबई विमानतळ नामकरण मुद्धा चांगलाच पेटताना दिसून येत आहे. एकीकडे राज्य सरकारने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा नाव जाहीर केलेलं असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांनी स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरून ठाम आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ मुंबई विमानतळाचा भाग असून याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे असे उधाण केले आहे.

त्यातच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच दि बा पाटील यांच्या नावाने घोषणा सुद्धा देण्यास सुरु केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस काल संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: