आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे देश-विदेशात कौतुक, लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश

 

पारनेर | राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना मतदार संघातील नागरिकांना कोरोनाच्या संसर्गात इलाजासाठी बाहेर जायला लागू नये म्हणून मतदार संघात कोविड सेंटर सुरू करून रुग्णसेवा करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कामाचे आता देश-विदेशात चर्च होऊ लागले आहेत. सतत दीड वर्षे करोना रुग्णाची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’ मध्ये समावेश झाला असल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली.

आज गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले आहे. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांंपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर, तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणाऱ्या मजुरांसाठी आश्रयाची सोय आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दिली होती.

Team Global News Marathi: