नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट – भाजपा

 

नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज सिडको घेराव आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला मनसेसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आता याच मुद्धावरून राजकारण सुद्धा चांगलेच तापताना दिसून येणार आहे.

यावर आता भाजपने तिखट प्रतिक्रिया देऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिलचं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून ही आमची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचे एक्सटेंशन असून याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असे मत त्यांनी मांडले होते.

Team Global News Marathi: