नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय”

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच राजकीय पक्ष संतापले असून मनसेने सुद्धा या विधानाचा समाचार घेतला आहे पुरे आता … यांनी आता घरी बसावं … मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये … नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा … पुरे आता … #संतापजनक #निषेध’ असं म्हणत राज्यपालांच्या विधानावरून मनसे नेते गजानन काळे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावरून आता राज्यपालांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

Team Global News Marathi: