देशभरातील सर्वपक्षीय ‘१७ खासदार’ बारामतीच्या दौऱ्यावर

 

बारामती | राष्ट्रवादी पक्षाचे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी देशातील विविध पक्षाचे १२ खासदार आणि काही उद्योगती बारामतीत आले आहेत. बारामतीतील विकास कामाच्या पाहणीसाठीचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणावरून हे सर्वजण बारामतीत आल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीतील विविध विकास कामे,बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार पाहणी करत आहेत. बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योग अशा विविध बाबींची पाहणी हे खासदार करत आहे. आज सायंकाळपर्यंत हा पाहणी दौरा सुरु राहणार आहे.

बारामतीतील विकास कामाची पाहणी करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे ५ तर विविध पक्षातील १२ खासदारांचा समावेश आहे. यावेळी या खासदारांनी बारामतीतल्या सर्व संस्थांना भेट देत केली विकासकामांची पाहणी केली. यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: