राष्ट्रवादी पक्षाच्या विध्यार्थी नेत्यानं उकळली लाखोची खंडणी

 

पुणे | राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर अनेक घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते तसेच अनेक नेत्यांवर आयकर विभाग तसेच सक्तवसुली संचनालय (ईडी) यांच्या चौकशीच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या अशातच आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्यानं एका विद्यार्थ्याकडून दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सदर राष्ट्रवादीच्या नेत्याने जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाईन आणि रोख स्वरुपात १० लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी दोन जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण मधुकर कोकणे आणि अमर सूर्यकांत पौळ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्यानं आपला मित्र अमर पौळ यांच्या मदतीनं फिर्यादी तरुणाकडून खंडणी उकळली आहे. यश जगदीश जाधव असं फिर्यादी विद्यार्थ्याचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे.

विशेष म्हणजे आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. 1कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात हातावर टेकवला अडीच कोटींचा बनावट चेक, पुण्यातील घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अलीकडेच सोशल मीडिया व्यवसायासाठी एक ऑफिस सरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे 50 लाखांची मागणी केली होती. पण फिर्यादीनं पैसे देण्यास टाळाटाळ केली.

Team Global News Marathi: