राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडू

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात.त्यातच आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच याच विधावरून त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत यावरच आता मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनोद पाटील म्हणाले, राज्यपालांना छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात त्यांनी नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते,’ असे विनोद पाटील म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही’, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे.

Team Global News Marathi: