राष्ट्रवादी १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार, पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मोठी घोषणा !

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अणे नद्यांना पूर येऊन जण जीवन विस्कळीत झाले आहे. तसीच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपल्या प्राणाला सुद्धा मुकावे लागले आहे. याच अप्र्श्वभूमीवर राज्य सरकारने सुद्धा भरीव माहितीची घोषणा केली असून आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित बैठक घेऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे मदतीची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते.

शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रात सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल.

पुढे बोलताना “राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येईल. याशिवाय वैद्यकीय पथकं पाठवली जातील. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Team Global News Marathi: