अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीने घेतली भूमिका

 

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकरलेल्या नथुराम गोडसे या भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालं आहे. अशात आता राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका आता समोर आली आहे. ‘राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे.

या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही’ असं राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

पाटील म्हणाले की, अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे असं बाबासाहेब पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: