नाशिकच्या एका राष्ट्रीय सायकलपटू महिलेशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना चांगलंच महागात पडलं असून त्याला चांगलंच हिसका दाखवला आहे. या महिलेने थेट कर्नाटक पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चांगलाच घाम फोडला आहे. यामिनी खैरनार असे या राष्ट्रीय सायकलपटूचे नाव आहे. कर्नाटकच्या हद्दीत झालेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली.
यामिनी खैरनार या प्रसिद्ध अशा सायकलपटू आहेत. त्यांनी सायकलिंगमध्ये आतापर्यंत अनेक पारितोषके जिंकलेली आहेत. मात्र कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर त्यांना वाईट अनुभव आला. कोरोना चाचणीच्या नावाखाली कर्नाटक पोलीस प्रवाशांना आडवत आहेत. तसेच आरीटपीसीआर चाचणीच्या नावाखाली कर्नाटक पोलीस पैसे उकळत असल्याचे खैरनार यांनी म्हटलंय. खैरनार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्याचा संपूर्ण व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला आहे.
तसेच कर्नाटकच्या अफझलपूर पोलीस ठाण्यात यामिनी खैरनार यांनी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे युनिफॉर्म नाही तसेच पोलिसांकडे कोणतेही ओळखपत्र नाही. तरीदेखील कर्नाटक पोलीस नियमबाह्य पद्धतीने प्रवाशांच्या गाड्या अडवून पैसे उकळत आहेत. असं खैरनार यांनी म्हटलंय.