नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंचं पोलीस महासंचालकांना पत्र

 

नाशिक | नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो असा आरोप पांडे यांनी लगावला आहे.

महसूल विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून भूमाफिया सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. दिपक पांडे यांच्या या पत्रामुळे महसूल विभाग आणि गृहखात्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, असा आदेश दिल्यामुळे चर्चेत आलेले दिपक पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे, त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राला. आता मात्र दीपक पांडेंनी थेट महसूल यंत्रणांना टार्गेट केलं आहे. या पत्रातून त्यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे.

तसेच, भूमाफिया महसूल अधिकारी ना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत. भूमाफिया कडून नागरिकांची सुटका व्हावी कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महसूल अधिकारीकडे असणारे कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावे, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

Team Global News Marathi: