नाशिक महापालिका जिंकून भगव्या झेंड्याखाली आणू

 

नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे त्यातच शिवसेनेने सुद्धा नाशिक मनपा जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून खुद्ध शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे मैदानात उतरले आहे. मागच्या काही दिवसांपासून राऊत यांच्या फेऱ्या नाशिक शहरांमध्ये वाढलेल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणले की, नाशिक महापालिका अंतर्गत असलेल्या रुग्णलयाला हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असं नाव देण्यात आलं. शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. महापालिका निवडणुकीत आपली कामचं आपल्याला पुढे घेऊन जातील असे विधान त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्ता स्थानी असेल असं वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्या खाली जिंकून आणू, असं संजय राऊत म्हणाले. नगरसेवकांनी कष्ठाने काम केलं त्यामुळे नाशिककर लक्षात ठेवतील, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: