जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ १०० दलितांनी सोडलं गाव !

 

महाराष्ट्र फक्त हा फुले,शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं नावालाच म्हंटलं जात पण आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जात-पाट पळली जाते असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यात घडलेला आहे. जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीतील १०० दलितांनी गाव सोडलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारी ही घटना आहे. एकविसाव्या शतकात मानवाने प्रगतीचे इमले बांधले पण जातीयवादाची भिंत पाडण्यात त्याला कुठली अडचण येतीय, हे कळायला अद्याप मार्ग नाही.

 

प्रकरण असे की, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आपले ठाण मांडले असून, पून्हा गावात परतणार नाही असे निर्णय घेतला आहे.

गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे. आमच्यावरील अत्याचार कधीपर्यंत आम्ही सहन करणार, असा संतप्त सवाल करुन आता आम्हाला या गावात राहण्यास काडीमात्र रस नाही, असं गावकऱ्यांनी प्रशासनाला सांगितलं.

Team Global News Marathi: