“नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही” – रामदास आठवले

 

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करून देशवासीयांना दिवाळीची मोठी भेट दिली. मात्र, यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता त्यांच्या या विधानाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी करायचे असतील, तर भाजपला देशात पराभूत करावे लागेल, असे म्हटले होते. या वक्तव्याचा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेत, नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही, असा खोचक टोला लगावला.

केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झाले आहे. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. ते धुळ्यात बोलत होते.

Team Global News Marathi: