नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट नोटीस !

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर सेना-भाजपमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या नोटीसमुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल (DHFL ) कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती

या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. यावर आता आमदार नितेश राणे यांना प्रतिक्रिया दिलेली असून सर्व आरोप फेटाळले आहेत.

Team Global News Marathi: