लाडक्या बाप्पाचे करु या स्वागत… गणेश प्रतिष्ठापनेसाठी हे आहेत शुभ मुहूर्त

नाशिक : भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाईल. गणेश पूजन विशिष्ट वेळेत आणि मुहूर्तावर करण्याची प्रथा आहे.

गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेले आहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे.

 

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता सरकारने लावून दिलेल्या काही नियमात बाप्पाचं आगमन होईल. काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. यंदा शुक्रवारी गणेश चतुर्थी असून, या दिवशी चित्रा नक्षत्र आहे. जर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणण्याचा विचार करत असाल तर गणेश मूर्ती स्थापनेचा आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त घ्या जाणून…

गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त

भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी १२ वाजून १८ मिनिटे

भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी ९ वाजून ५७ मिनिटे

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.

गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त : सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते १३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत.

गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य :

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे,

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: