पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध युद्ध पेटलेले दिसून येत असून भारतीय जनता पक्ष आता काँग्रेस पक्षावर तुटून पडला आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या गाडीवर दगडफेक आणि हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राणे यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, काँग्रेसने नारायण राणेंना चांगलाच टोमणा लगावला आहे. “तो सीन पीएमओच्या स्क्रिप्टमध्ये नव्हता”, असे काँग्रेसने म्हटले आहे.नारायण राणे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाणार होते, मात्र खराब वातावरणामुळे ते रस्त्याने गेले. त्यांना वाटेत अडवण्यात आले आणि समोरून दगडफेक हा हल्ला आहे. मी त्या घटनेचा निषेध करतो.”
त्यांच्या या व्हिडीओवर सर्वसामान्य नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “तो सीन पीएमओने दिलेल्या स्क्रिप्टमध्ये नव्हता…? हे विधान २ रुपयाच्या बेरोजगाराचे नाही तर मोदी सरकारच्या एका जबाबदार मंत्र्याचे आहे असा टोला काँग्रेसने नारायण राणे यांना लगावला आहे.