“नारायण राणेंचे ते वक्तव्य कटाचा भाग, भूमिका न बदलल्यास त्यांच्याविरुद्ध संघर्ष अटळ”

 

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र असताना राणेंचे सिंधुदुर्गातील कट्टर प्रतिस्पर्धी आणि आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना थेट इशाराच दिला आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हा व्यापक कटाचा भाग आहे. आता नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा त्यांच्याविरोधात राजकीय संघर्ष अटक आहे असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला होता.आज सावंतवाडीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला होता.

तसेच नारायण राणें यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल वक्तव्य एका कटाचा भाग असून, महाराष्ट्रात दंगे घडवण्याचा प्रयत्न असू शकतो. नारायण राणे यांनी जी प्रतिकिया दिली त्याला शिवसैनिकांकडून उलट प्रतिकिया येणार हे त्यांना माहिती होते. मग त्यांना कोणी बोलायला लावले का? असा सवाल केसरकर यांनी केला आहे.

Team Global News Marathi: